तुकाराम तुकाराम। नाम घेता कामे यम

तुकाराम तुकाराम। नाम घेता कामे यम।। १।।
धन्य तुकोबा समर्थ। जेणे केला हा पुरुषार्थ।। २।।
जळी दगडासहित वह्या। तारीयेल्या जैश्या लोहिया।।३।।
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा। तुका विष्णु नाही दुजा।। ४।।

तुकोबाराय

 

वारकरी सांप्रदायातील क्रांतिकारी संत जगदगुरू तुकोबाराय अशा या अवतारी संताबद्दल आज समाजातिल काहि लोक आक्षेपार्ह लिखान करतात याला कारण म्हणजे त्यांना तुकाराम महाराज कळले नाहित. पतिव्रता कळण्यासाठी पतिव्रताच लागते, ज्ञानी कळण्यासाठी ज्ञानीच लागतो, संत कळण्यासाठी संत व्हाव लागते.

संताचा महिमा संतची जानती। ईतराचे काम नाही ते।। संताचा महिमा तो बहू दुर्गम | शाब्दिकाचे काम नाही येथे ||

महाजांनी खाते वह्या बुडवल्या का? त्यांना व्यवहार कळत नव्हता काय ? ऊधार गुळ विकला काय काय कारण ? अभंग गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली काय कारण? अनेक प्रकरणे आहेत पण याचा अर्थ त्या काळातील लोकांना कळला नाही. तो या काळातील लोकांना काय कळणार! त्या वेळचे पंडित रामेश्वर शास्त्री, मंबाजी बुवा गोसावी यांना तुकाराम महाराज कळले नाहित ज्या मंबाजींनी तुकोबांना ढोरा सारख मारले त्याच मंबाजीचे हात पाय रात्री महाराजांनी चेपावे त्यावेळेस मंबाजिने विचाराव महाराज तुम्ही नेणके कोन आहात त्यावेळेस महाराजांचे शब्द आहेत – नव्हे तुका म्हणे दिसतो मि कैसा | पुसणे ते पुसा पांडूरंगा || विद्वानांना जर महाराज कळाले नाहीत त्याठिकाणी सामान्यांची गती काय? प्रत्येक अवतारात देवा सोबत असनारे महाराज! नव्हे तर प्रत्यक्ष विष्णुचे अवतार असनारे जगद्गुरु तुकाराम महाराज…आणि अशा महान संतांचा जे खुन झाला म्हणतात त्यांना तुकोबाराय कळलेच नाही.